‘ दख्खनचा राजा जोतिबा’ या मालिकेत हा अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत

By  
on  

कोठारे व्हिजन’ आता ‘दख्खनचा राजा जोतिबा’ ही मालिका घेऊन येणार असल्याचं आम्ही तुम्हाला सांगितलं होतं. आता या मालिकेत मुख्य भूमिकेत कोण दिसेल याची उत्सुकता वाढली आहे. या मालिकेचं मोशन पोस्टर नुकतंच समोर आलं होतं.

 

23 ऑक्टोबरपासून संध्याकाळी 6.30 ला ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये महेश कोठारे यांनी या मालिकेतील मुख्य कलाकाराचं नाव शेअर केलं आहे. विशाल निकम जोतिबाच्या भूमिकेत दिसणार आहे. पिळदार शरीरयष्टीचा असलेल्या विशालचं सोशल मिडिया फॅन फॉलोविंगही खुप आहे. विशाल यापुर्वी ‘साता जलमाच्या गाठी' या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसला होता. कोल्हापूर चित्रनगरीत या मालिकेचा मुख्य सेट आकारला येत आहे.

 

(Source: Maharashtra times) 

 

Recommended

Loading...
Share