ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांची प्रकृती अत्यवस्थ , अजिंक्य देव यांनी ट्विटद्वारे दिली माहिती

By  
on  

मराठी सिनेसृष्टीत आपल्या सदाबहार अभिनयाने रसिक प्रेक्षकांवर गारुड करणारी लाडकी ज्येष्ठ कलाकारांची जोडी म्हणजेच अभिनेते रमेश देव आणि सीमा देव. सीमा यांनी आपल्या प्रत्येक भूमिकेतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.  ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांची प्रकृती अचानक खालावली आहे. सीमा देव यांना अल्झायमरचा त्रास आहे.

 

सीमा यांचा मुलगा आणि अभिनेता अजिंक्य देवने सोशल मीडियावरील पोस्टद्वारे त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली. आईच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होण्यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन त्यांनी चाहत्यांना या ट्विटच्या माध्यमातून केलं आहे. 

अजिंक्य देव ट्विटमध्ये म्हणतो, ‘माझी आई सीमा देव अल्झायमरच्या आजाराने ग्रस्त आहे. आम्ही संपूर्ण देव कुटुंबीय त्यांची प्रकृतीमध्ये सुधारणा होण्यासाठी प्रार्थना करत आहोत. तसेच तिच्यावर प्रेम करत असणाऱ्या महाराष्ट्रातील चाहत्यांनी देखील त्या लवकरात लवकर बऱ्या होण्यासाठी प्रार्थना करा’ 

 

 

 ‘सुवासिनी’ , ‘जगाच्या पाठीवर’, ‘आनंद’ या सिनेमातल्या सीमा देव यांच्या भूमिका विशेष गाजल्या. 

 

Recommended

Loading...
Share