ह्या प्रसिध्द हिंदी मालिकेत झळकणार अभिनेत्री शिल्पा तुळसकर

By  
on  

मराठी सिनेमा आणि मालिका विश्वातला लोकप्रिय चेहरा म्हणून अभिनेत्री शिल्पा तुळसकर ओळखली जाते. तुला पाहते रे ह्या मालिकेत राजनंदिनीच्या भूमिकेत झळकल्यानंतर शिल्पा तुळसकर छोट्या पडद्यावर आता एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहेत. 

मेरे साई- श्रद्धा और सबुरी या हिंदी मालिकेतील पुढच्या भागात शिल्पा तुळसकर झळकणार आहेत.  श्रद्धेने ही मालिका प्रेक्षक  पाहतात. आगामी गोष्ट ही साई चरित्रातील एक मोठी गोष्ट आहे. साईंना जेव्हा अटक झाली होती आणि जी एक मोठी कलाटणी देणारी घटना होती, त्याचे चित्रण या कथेतून करण्यात येईल.

या मालिकेचा एक भाग होताना उत्साहित  झालेल्या शिल्पा तुळसकर सांगतात, “फेब्रुवारीत मी कुटुंबीय आणि मित्रमंडळींसोबत शिर्डीला गेले होते आणि मार्चपासून मी दर गुरुवारी साई चरित्र वाचू लागले. आणि मला या गोष्टीचा खूप आनंद वाटतो की त्यानंतर सात महिन्यांनी लॉकडाउननंतर मी मेरे साई मालिकेतून पुन्हा काम सुरू करते आहे. मी 17 वर्षांची असल्यापासून तुषार दळवीला ओळखते आणि आता पुन्हा त्याच्यासोबत एकत्र काम करण्यास  उत्सुक आहे.” अभिनेते तुषार दळवी ह्या मालिकेत साईबाबांची व्यक्तिरेखा साकारत आहेत. 

मालिकेतील यापुढचे कथानक खूप महत्त्वाचे आणि मनाला व्यथित करणारे आहे. पोलिसांनी द्वारकामाई येथे साईंना अटक केली होती, ती गोष्ट यात आहे. या गोष्टीत शिल्पा तुळसकर अभिनीत वसुंधरा हिला एक  व्यंग असलेले मूल आहे आणि साईंवरील तिच्या नितांत भक्तीमुळे साईंबद्दल चमत्कार घडताना ती पाहते आणि त्यामुळे तिला स्वतःच्या जीवनातील समस्यांशी लढण्याचे बळ मिळते.

वसुंधराची गोष्ट ही पाहा , सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील मेरे साई- श्रद्धा और सबुरी मालिकेत, रात्री 7:00 वाजता.

Recommended

Loading...
Share