माधुरी दीक्षितने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पती डॉ. श्रीराम नेने यांना दिल्या रोमॅण्टिक शुभेच्छा!

By  
on  

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित म्हणजे अभिनय आणि सौंदर्याचा सुदर मिलाफ. लग्नानंतर ही अभिनयसम्राज्ञी परदेशात निघून गेली. अभिनेत्री माधुरी दीक्षितने व्यवसायाने डॉक्टर असलेल्या श्रीराम नेनेंची आपल्या जोडीदाराच्या रुपात निवड केली. 

लग्नानंतर माधुरीने अभिनयापासून दूर राहणे पसंत केले. लग्नानंतर डॉ. श्रीराम नेनेंबरोबर माधुरी अमेरिकेत स्थायिक झाली होती. मात्र 2011 साली माधुरी आपल्या कुटुंबाबरोबर भारतात परतली आणि त्यानंतर माधुरीने पती श्रीराम नेने यांच्या साथीने पुन्हा एकदा सिनेसृष्टीत पुनरागमन केलं .

 

माधुरी ही सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असते. चाहत्यांशी कनेक्ट राहायला तिला खुप आवडतं. आज माधुरीच्या लग्नाचा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने पती डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबतचे गोड फोटो शेअर करत तिने त्यांना खास  शुभेच्छा दिल्या आहेत. 


माधुरी आपल्या पोस्टमध्ये म्हणते, “पुन्हा एकदा एका नव्या वर्षाची एकत्र सुरुवात. माझ्या स्वप्नातल्या राजकुमारासोबतचा प्रत्येक क्षण मी पुरेपूर जगते. राम तु माझ्या आयुष्यात असल्याबद्दल मी प्रचंड कृतज्ञ आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या तुला खुप खुप शुभेच्छा !”

 

पती डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबतचे अनेक रोमॅण्टीक, धम्माल आणि कौटुंबिक क्षणांचे फोटो-व्हिडीओ माधुरी नेहमी शेअर करत असते. माधुरीला तिच्या प्रत्येक कामात पतीची खंबीर साथ लाभते, हेच यावरुन दिसून येतं. 

पिपींगमूनमराठीतर्फे माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांना लग्नाच्या  वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा !
 

Recommended

Loading...
Share