By  
on  

कौतुकास्पद ! चाहत्यांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला या मराठी अभिनेत्रीचा वाढदिवस

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ह्या ऐतिहासिक मालिकेत राणी येसूबाई साकारत अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचली आणि तिने रसिकांची मनं जिंकली. या मालिकेमुळे तिचा खुप मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. मालिका संपली तरी तिची जाद अजूनही कायमच आहे. ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेतून एका कॉलेज तरुणीच्या भूमिकेतून प्राजक्ता आता प्रेक्षकांच्या भेटीला येते. 

सेलिब्रिटी म्हटलं की त्यांचे चाहते हे  आलेच. सेलिब्रिटींमध्ये चाहत्यांचा जीव अडकलेला असतो. त्यांच्यासाठी त्यांना भेटण्यासाठी चाहते काहीही करु शकतात. वाट्टेल त्या थराला जाऊ शकतात. कुठलाही वेडेपण करतात. पण तुम्ही कधी एकलंय एखाद्या चाहत्याने आपल्या लाडक्या कलाकारासाठी काहीतरी समाजपयोगी कार्य केलं आहे....कदाचित ही बाब तशी दुर्मिळच म्हणायला हवी. पण अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडला मात्र हे भाग्य लाभलंय. 

 

 

६ ऑक्टोबर हा प्राजक्ता गायकवाडचा जन्मदिवस होता. ह्या वाढदिवसानिमित्त तिच्यावर सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव झाला. परंतु एका चाहत्याने मात्र तिचा हा वाढदिवस अनोख्या पध्दतीने संस्मरणीय केला. 

 

 

नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत प्राजक्ताने  या आपल्या चाहत्याला छानशी प्रतिक्रियाही दिली आहे. हा चाहता सांगली जिल्ह्यातील असून त्याचे नाव ‘आनंद राजेंद्र पुजारी’ असे आहे. ‘ तुम्हाला भेटायचं स्वप्न होतं पण कुठून योग आला नाही म्हणून आम्ही अशा पद्धतीने आपला बिर्थडे केला…’ असे म्हणून गरीब मुलांना फळांचे वाटप आणि धान्य वाटप केलेला एक व्हिडिओ त्यांनी शेअर केला. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

असे fans मिळायला खूप नशिब लागतं ....Lockdown मुळे भेटता आलं नाही म्हणून काय झालं ..... अशा प्रकारे सुध्दा Gifts देऊन birthday celebrate करता येऊ शकतो . Thank you so much.... Hats off to your work . And I really like your this special Gift . #fanslove #fansappreciation #fanscraze #maharashtra #sangli #birthdaycelebration #socialworker #likeforlikes . . नावं:- आनंद राजेंद्र पुजारी गावं:- सांगली. तालुका. मिरज. जिल्हा. सांगली.

A post shared by Prajakta Gaikwad (@its_prajaktaa) on

 

 

ह्या चाहत्याला छानशी प्रतिक्रिया देत प्राजक्ता म्हणते, ‘असे fans मिळायला खूप नशीब लागतं…Lockdown मुळं भेटता आलं नाही म्हणून काय झालं…अशा प्रकारे सुद्धा Gifts देऊन birthday celebrate करता येऊ शकतो…’ असे म्हणून आपल्या चाहत्याला आश्वस्त करत…’ मलाही सोशल वर्कची आवड आहे आणि आपली नक्कीच भेट होईल’ असे म्हणून आभार व्यक्त केले आहेत.


 

चाहत्याच्या ह्या अनोख्या कार्याने प्राजक्ता आणि सर्वचजण भारावून गेले आहेत. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive