By  
on  

हा फोटो पोस्ट करत भरत जाधव यांनी दिला आई-वडिलांच्या आठवणींना उजाळा

अभिनेता भरत जाधव आता ‘सुखी माणसाचा सदरा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या निमित्ताने अनेक बाबी तो सोशल मिडियावर शेअर करत असतो. आता मात्र त्याने एक खास पोस्ट केली आहे. यावेळी या फोटोत त्याचे आई-वडिलही सोबत दिसत आहेत. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

आम्ही कॉलेज मध्ये एकांकिका करत असताना चंद्रलेखा नाट्य संस्थेची बस बाहेरून बऱ्याचदा बघायचो. आणि या बसमध्ये आपल्याला कधी तरी बसता येईल का म्हणून नेहमी विचार करायचो. नाटकाच्या बसमध्ये बसणं म्हणजे आम्हा नवोदितांना अप्रुप वाटायचं. नंतर 'ऑल द बेस्ट' आलं आणि त्याच बसने हजारो प्रयोग करत संपुर्ण महाराष्ट्रभर प्रवास केला. 'ऑल द बेस्ट' माझं पहिलं व्यावसायिक नाटक. तेंव्हा मला १०० रूपये नाईट मिळायची. त्यावेळी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की भविष्यात आपलीही एखादी नाट्य संस्था असेल आणि आपली स्वतःची नाटकाची बस असेल. २०१५ साली जेंव्हा 'भरत जाधव एंटरटेनमेंट कंपनी' ची पहिली बस घेतली तेंव्हा सगळ्यात जास्त आनंद आई बाबांना झाला. आपल्यामुळे आई वडिलांच्या चेहऱ्यावर खरं हास्य आणि समाधान आलं यातंच सगळं मिळवलं मी..! या कला क्षेत्राने मला अशा अगणित सुखी क्षणांची भेट दिलीये. #कृतज्ञता #सुखीमाणसाचासदरा

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat) on

 

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये भरत म्हणतो, ‘आम्ही कॉलेज मध्ये एकांकिका करत असताना चंद्रलेखा नाट्य संस्थेची बस बाहेरून बऱ्याचदा बघायचो. आणि या बसमध्ये आपल्याला कधी तरी बसता येईल का म्हणून नेहमी विचार करायचो. नाटकाच्या बसमध्ये बसणं म्हणजे आम्हा नवोदितांना अप्रुप वाटायचं. 
नंतर 'ऑल द बेस्ट' आलं आणि त्याच बसने हजारो प्रयोग करत संपुर्ण महाराष्ट्रभर प्रवास केला. 'ऑल द बेस्ट' माझं पहिलं व्यावसायिक नाटक. तेंव्हा मला १०० रूपये नाईट मिळायची. त्यावेळी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की भविष्यात आपलीही एखादी नाट्य संस्था असेल आणि आपली स्वतःची नाटकाची बस असेल.

२०१५ साली जेंव्हा 'भरत जाधव एंटरटेनमेंट कंपनी' ची पहिली बस घेतली तेंव्हा सगळ्यात जास्त आनंद आई बाबांना झाला.आपल्यामुळे आई वडिलांच्या चेहऱ्यावर खरं हास्य आणि समाधान आलं यातंच सगळं मिळवलं मी..! या कला क्षेत्राने मला अशा अगणित सुखी क्षणांची भेट दिलीये.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive