By  
on  

अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता अभिजीत साटमचा अनोख उपक्रम

अभिजीत साटम गेली वीस वर्ष मनोरंजन विश्वात वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या भूमिकेतून कार्यरत आहे. असामान्य विचार,त्याच कृतीत रुपांतर आणि इंटर प्राइजिंग कामाला प्राधान्य देणारा असा हा अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता. 

निर्माता म्हणून रंगभूमीवर नऊ दहा नाटकांची निर्मिती त्यांने केली. त्यातील मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी, संगीत लग्नकल्लोळ, मिस्टर अँड मिसेस, एक शून्य तीन, एपिक गडबड ही पुरस्कारांनी तारांकित अशी नाटकं त्याचबरोबर हापूस सारख्या यशस्वी चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन देखील त्याने केलं. 

teempool.com हि एक वेगळी संकल्पना असलेली  वेबसाईट तो आता आपल्यासाठी घेऊन आला आहे. संकल्पना व निर्मितीचे यश त्याचं आणि त्याच्या या टीमचं आहे. ह्या वेबसाईटच्या माध्यमातून या कठीण काळात बाहेर जाणं थांबलं पण मॉलमध्ये न जाता घरी बसल्या सुद्धा तो माॅलसारखा सोशल शॉपिंगचा अनुभव आपण घेऊ शकतो. 

मित्रमंडळी, सारखी आवड असणाऱ्यांना एकत्र करून एकत्र टीम शॉपिंग आणि स्वत:चे फ्लॅश सेल सुरू करू शकतो. एखाद्या गोष्टीसाठी एकत्र येण्याचा आनंद व एकत्र गोष्टींची खरेदी करून एकत्र सवलती मिळवल्याचा आनंद तुम्हाला यात मिळू शकेल. 

 

अनेक छोटे उद्योग धंदे बंद पडण्याच्या भीती पूर्ण वातावरणात असताना, ही वेब साईट हा आशेचा किरण आहे. कुठल्याही गुंतवणुकीशिवाय या टीम च्या माध्यमातून तुमचा छोटा उद्योग तुम्ही इथे सुरू करू शकता आणि ह्यासाठी teempool.com हा प्लॅटफॉर्म कायम तुमच्या पाठीशी उभा असेल. 

तुमची टीम तयार केली की आपोआप तुमचं ऑनलाईन शॉप तयार होतं त्या टीम च्या मार्केटप्लेस वर झालेल्या खरेदीचा तुम्हाला भाग करून घेणे हे ह्यांचं खरं वैशिष्टय. 

घरातून चालणारे उद्योग कॉलेजमधील नव्या विचारांची मुलं यांना आपलासा वाटणारा हा आधारक्षम असा प्रयत्न. आजचा महत्वाचा भाग म्हणजे सोशल मिडीया. चॅट करणं फोटोस, व्हिडिओस शेअर करणं ही सुविधा सुद्धा इथे उपलब्ध असणार आहे. लाॅकडाऊन च्या आधी ह्याची चाचणी करताना भरभरून प्रतिसाद मिळाला होता आणि आता नवीन काळातला हा नवीन दृष्टिकोन प्रत्यक्ष उभा राहतोय 2 नोव्हेंबर पासून. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive