By  
on  

Video: डॉ. अमोल कोल्हेचं ‘शिवगंध’ नेमकं काय आहे, जाणून घ्या

मराठी सिनेमे आणि मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणारे डॉ. अमोल कोल्हे हे त्यांच्या ऐतिहासिक भूमिकांसाठी ओळखले जातात. राजा शिवछत्रपती आणि स्वराज्यरक्षक संभाजी मालिकांमधल्या भूमिकेतून त्यांनी आपली छाप पाडली. 
 

ऐतिहासिक भूमिका पडद्यावर जिवंत करणं ही अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांची खासियत. आता अमोल कोल्हे हे शिरुर मतदार संघाचे खासदार आहेत. तसंच जगंदंब क्रिएशन्सच्या माध्यमातून ते निर्मितीची धुरासुध्दा सांभाळतायत. 
 

आता अमोल कोल्हे शिवगंध घेऊन चाहत्यांच्या भेटीला आले आहेत. पण नेमकं शिवगंध काय आहे, सिनेमा की मालिका अशा ब-याच चर्चा मध्यंतरी रंगल्या म्हणूनच जाणून घेऊयात शिवगंध काय आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

'राजा शिवछत्रपती' या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना आलेल्या अनुभवांवर आधारीत 'शिवगंध' हे पुस्तक आता वाचकांसाठी उपलब्ध आहे. यासाठी आपण डिंपल प्रकाशन व्हॉट्सअप.नं.९२२६९३७९२४ व जगदंब प्रतिष्ठान मो.नं. ९९७५५९३७०५ येथे फोन करुन आपली प्रत राखून ठेवू शकता. याशिवाय आपली मागणी आपण http://www.dimplepublication.com येथेही नोंदवू शकाल. हे पुस्तक सवलतीच्या दरात (पुठ्ठा बांधणी रुपये ४०० च्या ऐवजी रुपये ३५० व जनता बांधणी रुपये ३०० ऐवजी रुपये २५०) उपलब्ध आहे. वाचकांनी आपली मागणी अवश्य नोंदवावी ही नम्र विनंती. या पुस्तकाच्या विक्रीतून उभारल्या जाणाऱ्या रकमेतून जगदंब प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम घेण्यात येणार आहेत,याची कृपया नोंद घ्यावी ही विनंती. @amolrkolhe @dimplepublication @nitinarekar @drghanya

A post shared by स्वराज्य रक्षक संभाजी OFFICIAL (@swarajya_rakshak_sambhaji) on

 

 

'राजा शिवछत्रपती' या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना आलेल्या अनुभवांवर आधारीत 'शिवगंध' हे पुस्तक डॉ. अमोल कोल्हे यांनी लिहलं आहे. या पुस्तकाचं शब्दांकन डॉ. नितीन आरेकर यांनी केलं आहे. 

 

 

महत्त्वाचं म्हणजे, या पुस्तकाच्या विक्रीतून उभारल्या जाणाऱ्या रकमेतून जगदंब प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम घेण्यात येणार आहेत,


शिवगंधचा खरंच हा स्तुत्य उपक्रम आहे. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive