महाराष्ट्रात राहून मराठी भाषेचीच गळचेपी करणा-यांना पुन्हा एकदा मनसेने आपल्या स्टाईलने इशारा दिला आहे. ज्या महाराष्ट्रात तुम्ही तुमचं करिअर बनविण्यासाठी आलात आणि तिथल्याच मातृभाषेचा तुम्ही अनादर करता, हे कुठलाच मराठी माणूस सहन करु शकत नाही. नेहमीच वादाच्या भोव-यात असणा-या बिग बॉसच्या यंदाच्या 14व्या पर्वसुध्दा ब-याचं वादांनी घेरलं आहे.
काही दिवसांपासून राहुल वैद्य, जान कुमार सानू आणि निक्की तांबोळी यांच्या वाद सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. या वादादरम्यान राहुल वैद्यला बोलताना जान कुमार सानू यानं मराठी भाषेबद्दल काही आक्षेपार्ह शब्द उच्चारले. दरम्यान, हा भाग प्रकाशित झाल्यानंतर मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी जान कुमार सानूला धमकीवजा इशारा दिला आहे.
जान कुमार सानू... मराठी भाषेची याला चीड येते म्हणे. अरे तू कीड आहेस मोठी... मुंबईतून हाकलून देण्यासाठी मी नाॅमिनेट करतोय याला.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) October 28, 2020
“जान कुमार सानू… मराठी भाषेची याला चीड येते म्हणे. अरे तू कीड आहेस मोठी… मुंबईतून हाकलून देण्यासाठी मी नॉमिनेट करतोय याला,” असं अमेय खोपकर ' ट्विट करत म्हणाले.
मुंबईत राहून तर आता तुझं करिअर कसं बनतं जान सानू तेच बघतो आता मी.लवकरच तुला स्वत:ची चीड येईल ही माझी गॅरंटी. तुला थोबडवनार लवकरच आता आम्ही मराठी.
आणि कलर्ससारख्या वाहिनीने खरंतर हा सीन वगळायला हवा होता, पण एडिट केलं नाही ते बरं झालं, गद्दारांची तोंडं कशी असतात ते समजलं.— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) October 28, 2020
“मुंबईत राहून तर आता तुझं करिअर कसं बनतं जान सानू तेच बघतो आता मी. लवकरच तुला स्वत:ची चीड येईल ही माझी गॅरंटी. आता आम्ही मराठी लवकरच तुला थोबडवणार. कलर्ससारख्या वाहिनीने खरंतर हा सीन वगळायला हवा होता, पण एडिट केलं नाही ते बरं झालं, गद्दारांची तोंडं कशी असतात ते समजलं,” असं म्हणत खोपकर यांनी जान सानूला अल्टिमेटम दिला आहे. .