एका घटनेची तिसरी बाजू , अभिनेता विवेक सांगळेच्या घरच्यांना आले होते धमकीचे फोन

By  
on  

'आई माझी काळूबाई' मालिकेचा वाद हा सध्या माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चिला जातोय.   सेटवर करोनाची लागण झाल्याने ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं निधन झालं होतं.  त्यानंतर पुन्हा आता ही मालिका वेगळ्याच कारणाने प्रकाशझोतात आली आहे.  मालिकेतल्या वादाच्या ठिणग्या सर्वांसमोर आल्या आहेत. 

मालिकेत आर्याची प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने ही मालिका सोडली. निर्मितीसंस्था आणि प्राजक्तामध्ये झालेला वाद हे यामागचं कारण होतं. मालिकेच्या निर्मात्या आणि अभिनेत्री अलका कुबल व प्राजक्ता गायकवाड यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या अनेक फैरी झाडल्या गेल्या. पण यात एक नाव प्रामुख्याने समोर आलं ते म्हणजे अभिनेता विवेक सांगळेचं. 

दोन दिवस मौन बाळगून असेलला अभिनेता विवेक सांगळे अखेर काही माध्यमांसमोर व्यक्त झाला आणि त्याने आपली बाजू मांडली. 
काही वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनीधींशी व्यक्त होताना, अभिनेता विविके सांगळे म्हणाला,”मला ह्या संपूर्ण घटनेवर खरं  तर काहीच बोलायचं नव्हतं, पण मी जर मौन बाळगलं तर नेमकं त्या दिवशी काय घडलं हे कदाचित कळणार नाही, म्हणून तुमच्यासमोर येऊन बोलतोय. मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल व त्यांचे पती समीर सर हे दोघंही प्रंचंड कोऑपरेटिव्ह आहेत. करोनाच्या काळात दोघांनी प्रचंड आर्थिक आणि मानसिक संकटांना तोंड दिलं व शो मस्ट गो ऑनप्रमाणे मालिका सुरु ठेवली. आज मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतेय. टीआरपी खुप छान आहे. 

विवेक पुढे सांगतो, “आशाताईंना करोनाची लागण झाली होती. तेव्हा त्यांच्यासह युनिटमधील बरेचजण पॉझिटिव्ह आढळले होते. तेव्हा अलकाताई आणि समीर सर सतत त्यांच्यासोबत हॉस्पिटलमध्ये होते. इथे सेटवर सर्वांची तपासणी करुन ज्यांच्यात लक्षणं नाहीत जे निगेटिव्ह आहेत त्यांना प्रोडक्शनने घरी जाण्याची परवानगी दिली होती. मी निगेटिव्ह होतो. पण माझे इतर सहकारी पॉझिटिव्ह होते, पण मित्र व माणूसकीच्या नात्याने त्यांना तसं सोडून जाणं माझ्या तत्त्वात बसत नव्हतं. त्यांना मदत करायचीच हे मी ठरवलं. म्हणून कोणाला हॉस्पिटलमध्ये डबा पोहचवणं,  फळं नेऊन देणं इतर मदत मी तिथेच राहून केली. त्यानंतर माझी पुन्हा एकदा टेस्ट झाली व त्यातही मी निगेटिव्हचं आढळलो. नंतर प्राजक्ता व मला घरी जाण्यासाठी एक गाडी प्रोडक्शनने दिली होती. मी पुढे ड्रायव्हरसोबत बसलो होतो आणि मागे प्राजक्ता व तिची आई बसल्या होत्या. पण त्या  येण्यापूर्वीच मी फोनवर एडमिट असलेल्या मित्राला बरं वाटावं म्हणून थोड्या शिवराळ भाषेत बोलत होतो, परंतु त्या दोघी आल्या आल्या मी फोन लगेच ठेवला. पण त्या काही गाडी सुरु करु देत नव्हत्या, त्यांना माझ्यासोबत प्रवास करायचा नव्हता. त्या सारख्या टोमणे देत होत्या. की इतरांना करोना झाला तर कोण जबाबदार राहणार, ज्यांना समाजसेवा करायचीय त्यांनी करा, आम्हाला का ह्यात का सफर करतायत....” 

ह्यानंतर बरेच वाद-विवाद घडल्याचं विवेकने ह्या मुलाखतीत सांगितलं. ही दोन महिन्यांपूर्वीची गोष्ट होती. 

विवेक म्हणतो,” प्राजक्ताने मालिका सोडल्याच्या बातम्या झळकल्यानंतर मला सातारा, सांगली आणि महाराष्ट्रातल्या कुठल्या कुठल्या भागातून धमकीचे फोन येऊ लागले. इतकंच नव्हे तर माझ्या घरी माझ्या आई-वडीलांनासुध्दा हे फोन आले.  मग मी ठरवलं आत्ता गप्प बसून चालणार नाही, माध्यमांसमोर खरं काय ते यायलाच हवं. “

 

“ सेटवर तिच्या नख-यांच्या ब-याच चर्चा असायच्या, पण मी त्यावर विश्वास ठेवणा-यांपैकी नाही, मी स्वत: जे पाहतो त्यावर विश्वास ठेवतो.  प्राजक्ता परिक्षेच्या नावावर सुपा-या करायची. एकदा तर तिने सांगितलेल्या परिक्षेच्या तारखेच्या दिवशीचे तिच्या सुपारीचे बॅनर्स आमच्या सर्व युनिटच्या लोकांपर्यंत पोहचले होते. तो एक मोठा पुरावाच आहे. प्राजक्ता ही ह्या मालिकेची नायिका आहे. तिच्यासाठी निर्मात्यांनी खुप मोठा खर्च केला आहे. मी तर एक सहाय्यक अभिनेता आहे, जर तिचं काहीचं चुकलं नसतं तर मला बाजूला करणं अलकाताईंना खुप सोप्पं गेलं असतं. पण तसं झालं नाही. तिच्या वागण्याला कंटाळूनच हा टोकाचा निर्णय घेण्यात आला “
 

Recommended

Loading...
Share