By  
on  

मिताली मयेकर म्हणते, ‘....जेव्हा घरचेच नाव चुकतात....’

अभिनेत्री मिताली मयेकर सध्या ‘लाडाची मी लेक गं’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या समोर येते आहे. या मालिकेतील कस्तुरीच्या साध्या सोज्वळ लूकला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मितालीने नुकतीच ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात हजेरी लावली आहे. पण या शो दरम्यान घडलेल्या एका छोट्या चुकिला धमाल कॅप्शन देत तिने पोस्ट शेअर केली आहे.

 

 

मितालीवर फोकस असताना तिचं नाव मिताली मयेकर ऐवजी मिताली देशमुख असं दाखवलं गेलं. ही चुक लक्षात येताच तिने ‘जेव्हा घरचेच नाव चुकतात तेव्हा’ हे भन्नाट कॅप्शन देत पोस्ट शेअर केली आहे. अर्थातच मिताली पुन्हा या शोमध्ये हजेरी लावेल त्यावेळी ही चुक सुधारली जाईल अशी आशा करायला हरकत नाही.

Recommended

PeepingMoon Exclusive