मराठी सिनेसृष्टीत अष्टपैलू कामगिरीने स्वत:चे स्थान निर्माण करणारे अभिनेते म्हणजे सचिन पिळगावकर. अभिनय, दिग्दर्शन, नृत्य आणि गायन या क्षेत्रात त्यांनी आपला खास ठसा उमटवला आहे. सचिन आपल्या सिनेमांबाबतच्या अनेक आठवणी चाहत्यांशी शेअर करत असतात.
आताही त्यांनी एका खास सिनेमाची आठवण शेअर केली आहे. ‘हा माझा मार्ग एकला’ या सिनेमात बालकलाकाराची भूमिका साकारली होती. या सिनेमातील बालकलाकाराच्या भूमिकेसाठी सचिनजींना राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.