By  
on  

‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ ... ‘मुळशी पॅटर्न’ पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन करण्यात आले. यामुळे मागील आठ महिन्यापासून थिएटर, मल्टिप्लेक्स बंद होते. आता दोनही 50 टक्के आसन क्षमतेसह सुरू झाले आहेत. मागील काही महिन्यात आपण छोट्या पडद्यावर अनेक गोष्टी बघितल्या मात्र त्यात मोठ्या पडद्याची मजा काही औरच असते हे प्रकर्षाने जाणवले. मोठा पडदा खुला झाल्यानंतर असाच एक थरार प्रेक्षकांना पुन्हा एकदा नव्याने थिएटरमध्ये अनुभवायला मिळणार आहेत, कारण प्रविण विठ्ठल तरडे लिखित, दिग्दर्शित सुपरडुपरहीट ‘मुळशी पॅटर्न’ पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आह

अभिजित भोसले जेन्युईन प्रॉडक्शन्स एलएलपी आणि पुनीत बालन एंटरटेनमेंट प्रा. लि. यांची  निर्मिती असलेल्या, शेतकर्‍यांच्या प्रश्नावर संवेदनशिल भाष्य करणार्‍या ‘मुळशी पॅटर्न’ या मराठी चित्रपटाने महाराष्ट्राच्या मनात स्थान मिळविले आहे. या चित्रपटाला विविध पुरस्कार सोहळ्यातही सन्मानित करण्यात आले. या चित्रपटाने कोणत्याही मोठ्या स्टुडीओच्या पाठबळाशिवाय केवळ माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर बॉक्स ऑफिसवर खतरनाक कामगिरी करत दैदीप्यमान यश संपादन केले आहे. काल्पनिक कथेवर आधारीत, वास्तवाच्या जवळ जाणाऱ्या या चित्रपटाला शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

अबालवृद्धांनी डोक्यावर घेतलेल्या या चित्रपटातील ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ गाण्याने आपली घौडदौड कायम राखत नुकताच ५३ मिलियन व्हूजचा टप्पा पार केला. आता पुन्हा एकदा ‘मुळशी पॅटर्न’ चा थरार थिएटरमध्ये अनुभवता येणार आहे, हा चित्रपट पुणे, नवी मुंबई, उल्हासनगर, डोंबिवली, नाशिक, कोल्हापूर, अकलूज या शहरात प्रदर्शित झाला आहे.
 

Recommended

PeepingMoon Exclusive