By  
on  

नऊवारीत दिसला पाठकबाई म्हणजेच अक्षयाचा दिलखेचक अंदाज, पाहा व्हिडियो

'तुझ्यात जीव रंगला' फेम मालिकेतील पाठकबाई उर्फ जिजा म्हणजेच अक्षया देवधर सोशल मिडीयावर नेहमीच अ‍ॅक्टीव्ह असते. अनेकदा ती तिचे फोटो, व्हिडियो चाहत्यांशी शेअर करत असते. नुकताचा अक्षयाने एक व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये तिचा दिलखेचक अंदाज दिसतो आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

 

अक्षयाने नऊवारीमधील व्हिडियो शेअर केला आहे. अलीकडेच तिने चला हवा येऊ द्याच्या मंचावर हजेरी लावली होती. तिच्या या मराठमोळ्या साजात अक्षया खुपच सुरेख दिसत होती. गुलाबी नऊवारीवर पारंपरिक दागिने चार चांद लावताना दिसत आहेत. याशिवाय कपाळावरची नाजूक चंद्रकोर तिचा लूक पुर्ण करत आहे. चाहते अक्षयाच्या या लूकच्या प्रेमात पडले असतील यात शंका नाही.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive