By  
on  

स्मिता शेवाळे आणि रोशन विचारेची केमिस्ट्री असलेलं ‘मन हे वेडे’ चा टीजर समोर

अभिनेत्री स्मिता शेवाळे आणि रोशन विचारे ‘मन हे वेडे’ या रोमॅंटिक गाण्यामधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या गाण्याचा टीजर नुकताच समोर आला आहे. या गाण्यामध्ये  स्मिता शेवाळे आणि रोशन विचारे या दोन लोकप्रिय कलाकारांच्या फ्रेश जोडीचा रोमान्स पाहता येणार आहे. 

 

 

मन हे वेडे या गाण्याची निर्मिती श्रीनिवास कुलकर्णी यांनी केली आहे. हे गाणं अन्वेशाने स्वरबद्ध केला असून जीवन मराठेने संगीतबद्ध केले आहे. स्मिता आणि रोशन यापुर्वी सोनी मराठीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेत झळकले होते. या गाण्याचं दिग्दर्शन योगेश अनिल तावर यांनी केलं आहे. हे गाणं 27 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive