By  
on  

‘चला हवा येऊ द्या’ च्या स्टेजवर रंगलाय क्रिकेटचा खेळ, पाहा व्हिडियो

घरबसल्या मनोरंजनाची भरघोस मेजवानी आणणारा कार्यक्रम म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’.  या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान  निर्माण केलं आहे. सागर कारंडे, श्रेया बुगडे, भाऊ कदम, कुशल बद्रिके आणि भारत गणेशपुरे हे  कलाकार आपल्या विनोदाच्या टायमिंगने हसवतातच. यांच्या जोडीला स्नेहल शिदम, योगेश सोमण,  अंकुर वाढवे हे कलाकार विनोदाचा डबल डोस देतात. 

 

 

 हे कलाकार ऑनस्क्रीन तर मनोरंजन करतातच. पण अनेकदा पोस्टच्या माध्यमातून हे कलाकार ऑफस्क्रीनही धमाल करताना दिसत आहेत. सागर कारंडेने एक व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये फावल्या वेळात हे कलाकार क्रिकेट खेळताना दिसत आहेत. अर्थात सागरने हा फक्त टाईमपास नसून पुढील एपिसोडचा सराव आहे असं म्हटलं आहे. त्यामुळे पुढच्या एपिसोडमध्ये काहीतरी रंजक पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive