By  
on  

कोल्हापूरच्या रांगड्या मातीत सजलेलं रोमॅंटिक गाणं ‘स्पर्शात हे

कोल्हापूरच्या मातीतील रोमॅण्टिक सॉंग आज प्रेक्षकांच्या भेटीला युवा दिग्दर्शक चैतन्य अरुण डोंगरे व निर्मात्या संचिता डोंगरे - कुलकर्णी यांनी "स्पर्शात हे" रोमॅण्टिक गाणे तयार केले आहे. या दोघांनी गेली सहा महिने नवीन कलाकारांना सोबत घेऊन कोल्हापूरच्या मातीतील मराठी गाणे तयार केले.

 

 

हे गाणे आज २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ पासून चेरी मोशन्स यू ट्यूब चॅनेलवर पहायला मिळणार असल्यामुळे या सॉन्गबद्दल प्रचंड उत्सुकता सोशल मिडीयातून व्यक्त होऊ लागली आहे. चेर मोशन्स यू ट्यूब चॅनेल प्रस्तुत मराठी प्रेम गीत " स्पर्शात हे " सॉन्गचे दिग्दर्शक आणि गायक चैतन्य डोंगरे आहेत. गीतकार देवयानी साठे, निर्मात्या संचिता डोंगरे -कुलकर्णी, संगीत आणि ध्वनिमुद्रण मोहित कुलकर्णी यांनी दिलेले आहे. सहाय्यक दिग्दर्शक साईप्रसाद महेंद्रकर, गाण्याचे संपूर्ण चित्रीकरण दत्तात्रय फरांडे, तेजस गायकवाड यांनी केले आहे. ड्रोन व्हिडिओ तौफिक मिर शिकारी यांनी तर जाहिरातीचे काम सुशांत पाटील यांनी पाहिले. स्पर्शात हे या गाण्यात मुख्य अभिनयाचे काम अभय पाटील, ज्योती शिंदे, विशाल म्हातुगडे, साईप्रसाद महिंद्रकर, अंकिता चव्हाण इरफान मनेर यांनी अत्यंत उत्तमरित्या साकारल्यामुळे या गाण्याबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive