By  
on  

'एक बुद्धिमान मैत्रीण हकनाक गेली....निःशब्द झालोय', सलील कुलकर्णींची भावनिक पोस्ट

वरोरा येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी सोमवारी विषारी इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण आनंदवन शोकसागरात बुडालं आहे. तसंच सर्वत्र या घटनेचे पडसाद उमटताना दिसतायत.तर सामाजिक वर्तुळ या बातमीने हेलावून गेलं आहे. मराठी सिनेसृष्टीतले प्रसिध्द  संगीतकार, गायक आणि लेखक सलील कुलकर्णी यांनी फेसबुकवर पोस्टच्या माध्यमातून आपल्या मैत्रिणीच्या आत्महत्येसंदर्भातले काही सवाल उपस्थित केले आहेत. 

‘ताण..मनावर..कोणाचा? परिस्थितीचा? माध्यमांचा? चर्चेचा? एक बुद्धिमान मैत्रीण हकनाक गेली. नि:शब्द झालोय.. शीतल आमटे.. का गं?,’ असं  सलील कुलकर्णी फेसबुक पोस्टमध्ये विचारतायत. डॉ. शीतल आमटे-करजगी या आनंदवनची सर्व जबाबदारी लिलया पेलत होत्या. डॉ. बाबा आमटे यांच्या तिस-या पिढीचं त्या खंबीर नेतृत्व सांभाळायच्या. 

 

ताण..मनावर..कोणाचा ? परिस्थितीचा ? माध्यमांचा ? चर्चेचा ? एक बुद्धिमान मैत्रीण हकनाक गेली....निःशब्द झालोय.. शीतल आमटे का ग ?

Posted by Saleel Shriniwas Kulkarni on Monday, November 30, 2020

 

 गेल्या काही महिन्यांपासून आमटे कुटुंबात वाद सुरू होता.  याच वादात  काही दिवसांपूर्वी शीतल आमटे यांनी सोशल मीडियाद्वारे आमटे कुटुंबातील सदस्यांबाबत बदनामीकारक व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर हा वाद विकोपाला गेल्याचं समजतं. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive