शेतीत रमलीय ही मराठी अभिनेत्री, पिकवतेय फळं आणि भाज्या

By  
on  

लॉकडाऊनच्या काळात फावल्या वेळेत सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनीच अनेक छंद जोपासले. मोकळ्या वेळेचा सदुपयोग केला. पण काहींनी हाच छंद व्यवसायातही रुपांतरीत केला आहे आणि यामुळेच त्यांना नवी दिशासुध्दा मिळालीय. 

मराठी टेलिव्हिजनवरची प्रसिध्द अभिनेत्री रश्मी अनपट आणि तिचे पती अभिनेते अमित खेडेकर या सेलिब्रिटी कपलनेही लॉकडाऊनच्या काळात अशीच एक अनोखी वाट चोखंदळली आहे. या दोघांनाही बागकामाची आवड आहे. यातूनच त्यांनी हा उपयोगी छंद जोपासलाय. त्यांनी छान असा मळा फुलवलाय. त्याची मशागत करणं, खतपाणी करणं हे दोघं जातीने लक्ष देऊन करतायतआणि त्याची शब्दश: फळंसुध्दा त्यांना लवकरच मिळणार आहेत. 
आपल्या घरच्या शेतीचे सुंदर असे हे फोटो शेअर करत रश्मी म्हणते, “माणसाने नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न कायम केला पाहिजे ... लॉकडाऊनच्या काळात नवीन गोष्टी शिकण्यासाठी केलेल्या मेहनतीच फळ आता दिसतंय ... Stay tuned..”
.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rashmi Anpat (@rashmianpat)

 

रश्मीने आपल्या पोस्टमध्ये स्टे ट्यून्ड म्हटलंय म्हणजेच आपल्या बागेचे आणखी फोटो रश्मी चाहत्यांपर्यंत पोहचवणार आहे, एवढं मात्रं नक्की. 

Recommended

Loading...
Share