By  
on  

म्हणून निशिगंधा वाड यांना मागावी लागली माफी, जाणून घ्या

मराठी सिनेसृष्टीतील गुणी अभिनेत्री म्हणून निशिगंधा वाड प्रसिध्द आहेत. सिनेसृष्टीतला 80-90 चा काळ त्यांनी गाजवला आहे. दमदार अभिनयासोबतच त्यांच्या सुस्वभावी आणि नम्र शिष्टाचारासाठी त्यांची खास ओळख इंडस्ट्रीत आहे. पण नुकतंच एका शोमध्ये केलेल्या त्यांच्या वक्तव्यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत. LGBTQ या मुद्द्यावर त्यांचं मत मांडलं होतं. मात्र, त्यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर चांगलाच वाद निर्माण झाला. त्यानंतर निशिगंधा वाड यांनी माफी मागितली आहे.

अभिनेत्री सुलेखा तळवलकरच्या ‘दिल के करीब’ या शोमध्ये निशिगंधा वाड एका भागात उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी त्यांच्या करिअर, पर्सनल लाइफसोबत अनेक मुद्द्यांवर दिलखुलास चर्चा केली. यात समलैंगिक संबंध या मुद्द्यावर त्यांनी भाष्य केलं आहे. त्यांच्या या मुलाखतीचा व्हिडीओ सुलेखा तळवलकर यांच्या युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आला. या मुलाखतीत बोलताना त्या म्हणाल्या ‘मला निसर्गाच्या विरोधात जाणारा अनैसर्गिक प्रवास थोडासा पचनी पडत नाही’, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्याच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. अनेकांनी त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला.  मात्र, वाढता वाद लक्षात घेता त्यांनी माफी मागितली आहे.

 

 

“LGBTQ समूह किंवा कोणत्याही व्यक्तीच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. पण जर माझ्या वक्तव्यामुळे कोणी दुखावलं गेलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करते. मी सामाजिक क्षेत्रात काम करते. तसंच तृतीयपंथीयांसोबतही काम करते. कोणावरही आरोप करण्याचा माझा हेतू नव्हता. गे असणं किंवा लेस्बियन असणं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. त्या संदर्भात मी बोलू शकत नाही. होमोफोबिया अशी माझी मनोवृत्तीदेखील नाही”, असं निशिगंधा वाड यांनी माफी मागताना म्हटलं आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive