दिग्दर्शक रवी जाधव यांना पितृशोक, शेअर केली भावनिक पोस्ट

By  
on  

मराठी सिनेसृष्टीचे प्रसिध्द दिग्दर्शक रवी जाधव यांना पितृशोक झाला आहे. डोंबिवलीतील त्यांच्या घरी एका अल्पशा आजाराने त्यांनी 9 जानेवारी रोजी शनिवारी अखेरचा श्वास घेतला. रवी जाधव यांनीच सोशल मिडीयावर वडीलांच्या आठवणींत त्यांचे जुने फोटो शेअर करत ही दुखद वार्ता सर्वांना सांगितली. 

रवी जाधव भावनिक होत आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, "आमचे वडील श्री. हरिश्चंद्र भिकाजी जाधव यांचे शनिवार दिनांक ९ जानेवारी २०२१ रोजी त्यांच्या डोंबिवली येथील राहत्या घरी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. या कठीण काळात आम्हा जाधव कुटुंबीयांना आधार देणाऱ्या आमच्या सर्व मित्रमंडळी, नातेवाईक, हितचिंतक आणि कासे ग्रामस्तांचे शतश: आभार.
आमचे पप्पा नेहमीच निर्धास्तपणे हसत खेळत रहायचे. आजही ते कासे गावातील श्री देव गजाननाच्या देवळाजवळ एखादे सुंदर फुलपाखरु होऊन छान बागडत असतील.
ॐ शांती - शुभांगीनी, रविंद्र, राजेंद्र, महेंद्र, विनोद, मेघना, अर्चना, मनाली, वैशाली, तेजस, वैभव, अथर्व, वैष्णवी, ऐश्वर्या, अंश "

 

 

 

 

Recommended

Loading...
Share