वेद आणि विज्ञान यांच्यातील संबंध दर्शविणारा 'कानभट'चं मोशन पोस्टर रसिकांच्या भेटीला

By  
on  

बॉलिवूड  फिल्ममेकर अपर्णा एस होशिग यांनी नुकतेच सोशल मिडीयावर 'कानभट' या त्यांच्या आगामी मराठी चित्रपटाची पहिली झलक शेअर केली. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये दडलंय प्रेक्षकांसाठी एक खास सरप्राईज आहे. आणि ते सरप्राईज म्हणजे अभिनेता भाव्या शिंदे यांनी साकारलेल्या प्रमुख भूमिकेचा विशेष लूक. भाव्या शिंदे यांचा हा लूक सर्वांचे लक्ष आकर्षून घेईल यात शंका नाही.

अपर्णा एस होशिग यांनी गेल्या ९ वर्षात बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांसाठी काम केले आहे. 'जिना है तो ठोक डाल','उटपटंग'आणि निल नितीन मुकेशची प्रमुख भूमिका असलेला 'दशेरा' या तीन चित्रपटांची निर्मिती देखील अपर्णा यांनी केली आहे. आता नवीन काही तरी करु पाहणा-या अपर्णा 'कानभट' या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शिकाच्या भूमिकेत पहिल्यांदाच दिसणार आहेत.

या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी म्हटले की, "मराठी चित्रपट आता सातासमुद्रापार पोहचला आहे, नवीन बेंचमार्क्स त्याने तयार केले आहे. मराठी चित्रपटांची प्रशंसा आता सर्वत्र होत आहे. माझ्या चित्रपटाची गोष्ट एका तरुण मुलाचे स्वप्न आणि त्याच्या इच्छा यावर आधारित आहे. पण नियतीने त्याच्यासाठी काही वेगळ्या गोष्टी प्लॅन केल्या आहेत ज्याच्यासाठी तो वेगळ्या मार्गाचा वापर करत आहे. या चित्रपटाची गोष्ट वेद आणि विज्ञान यांच्यातील संबंध दर्शविते आणि हीच चित्रपटाची शैली आहे."

 

 

भोर राजवाडा, मुंबई आणि उत्तराखंड येथे शूट झालेल्या या चित्रपटाला संगीत राहुल रानडे यांनी दिले आहे. तर गाण्याचे बोल गुरु ठाकूर यांनी लिहिले आहेत आणि अरुण वर्मा हे डीओपी आहेत. मीराज अली यांनी या चित्रपटाचे संकलन केले आहे तर सतिश चिपकर यांनी कला दिग्दर्शनाची जबाबदारी पेलली आहे. हा चित्रपट यावर्षी म्हणजेच २०१९ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

 

Recommended

Loading...
Share