By  
on  

'६ व्या अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवाची' घोषणा

गरपालिका क्षेत्रामध्ये सलग ५ वर्षे आयोजित केला गेलेला हा एकमेव चित्रपट महोत्सव असून मराठी मनोरंजन सृष्टीमध्ये या महोत्सवाने मानाचे स्थान प्राप्त केले आहे. २०२० मध्ये निर्मिती झालेले प्रदर्शित/ अप्रदर्शित मराठी चित्रपट या महोत्सवासाठी पात्र असतील व त्यांचे परिक्षण झाल्यावर नामांकन यादी जाहीर करण्यात येईल. सर्वसाधारण निकषांसोबतच चित्रपट निर्मितीशी निगडित विविध तंत्रज्ञांचा समावेशही पुरस्कार नामांकनांमध्ये केला जातो. या संदर्भात चित्रपटसृष्टीमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत करणाऱ्या  'स्पॉट दादांचा' सन्मान हे या महोत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य आहे.

यावर्षीचे विशेष घोषित पुरस्कार पुढील प्रमाणे :

जीवन गौरव पुरस्कार-  ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर

कारकीर्द सन्मान विशेष पुरस्कार - श्रीकांत मोघे

तंत्रज्ञ गौरव पुरस्कार - ज्येष्ठ संकलक व्ही एन मयेकर

सिने पत्रकारिता गौरव पुरस्कार- गणेश आचवल

आजपर्यंत रवी पटवर्धन, उषा नाडकर्णी, विजय चव्हाण, किशोर नांदलस्कर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.या महोत्सवाची संकल्पना आणि दिग्दर्शन सुप्रसिद्ध पटकथा लेखक, दिग्दर्शक महेंद्र पाटील यांचे आहे. महोत्सव संस्थापक सुनील चौधरी आणि आयोजक निखिल चौधरी आहेत.

यावर्षीचा अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सव हा 'कोविड नियम संकेतानुसार' आयोजित करण्यात येत आहे.दरवर्षीप्रमाणेच मराठी मनोरंजन सृष्टीतील  नामवंत कलाकारांच्या उपस्थितीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरणामुळे अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सव - २०२० ची रंगत वाढणार.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive