आर्या आंबेकरचं हे स्वप्न झालं पुर्ण, पाहा फोटो

By  
on  

लोभस लूक आणि सुरेल आवाज याचं समीकरण म्हणजे आर्या आंबेकर. आर्या आंबेकरने गायलेल्या अनेक गाण्यांनी चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं आहे. आर्याने आजवर अनेक मालिकांचं टायटल साँग, सिनेगीतं गायली आहेत. आर्याने तिचा एक फॅन मोमेंट शेअर केला आहे. आर्याने नुकतंच एक पोस्ट शेअर केली आहे. 

 

 

तिने या पोस्टमधून तिचा फॅन मोमेंट शेअर केला आहे. आर्याने नुकतंच अजय-अतुल यांच्यासोबत रेकॉर्डिंग केलं. स्वप्न पुर्ण झालं या कॅप्शन खाली तिने अजय-अतुल यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे. आर्याने चंद्रमुखी या सिनेमासाठी रेकॉर्डिंग केलं आहे.  प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांच्या चंद्रमुखी या कादंबरीवर आधारित हा सिनेमा आहे. अभिनेता प्रसाद ओकने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

Recommended

Loading...
Share