जया बच्चन करणार अभिनयात कमबॅक? दिसणार मराठी सिनेमात?

By  
on  

बिग बी अमिताभ यांच्यासोबत लग्न केल्यानंतर अभिनेत्री जया बच्चन यांनी अभिनयाला राम राम ठोकला. पण कुटुंबाची जबाबदारी कमी झाल्यानंतर त्यांनी मोजक्या बॉलिवूड सिनेमातून अभिनयही केला.पण आता 'शी द पीपल' या वेबसाईटनुसार जया बच्चन आता मराठी सिनेमात पदार्पण करणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक गजेंद्र अहिरे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.

 

या सिनेमाचं नाव अजून समोर आलं नाही. याशिवाय जया यांनीही याबाबत काहिही वाच्यता केली नाही. जया पहिल्यांदाच मराठी सिनेमात दिसणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

Recommended

Loading...
Share