साऊथचा तडका असलेल्या 'लॉ ऑफ लव्ह' सिनेमाचा टिझर पाहा

By  
on  

थंडीच्या गोड गुलाबी वातावरणात प्रेमाची अलगद लागणारी उब एक वेगळाच अनुभव देऊन जाते.. असंच अनोखं प्रेम ''लॉ ऑफ लव्ह'' सिनेमाच्या निमित्ताने पहायला मिळणार आहे. नुकताच या सिनेमाचा टिझर सोशल मीडिया साईट्सवर लॉंच केला गेला. वेदिका फिल्म क्रिएशन प्रस्तुत या सिनेमाचा धडाकेबाज टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

लविंग डॅशिंग आदित्य आणि साक्षी यांचं अनोखं प्रेम अभिनेता व निर्माता उदय जानकर आणि अभिनेत्री शाल्वी शहा यांच्या रूपाने पाहायला मिळणार आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि यतीन कार्येकर हे दिग्गज कलाकार देखील आहेत.
 

 

 

साऊथचा तडका असलेला हा सिनेमा जो प्रत्येक वयोगटातील प्रेक्षक मनापासून एन्जॉय करू शकतील .

Recommended

Loading...
Share