‘गोरी मेम’ नेहा पेंडसे ट्रोलर्स वर चांगलीच उखडली, म्हणते मी कपिल शर्मा नाही....’

By  
on  

नेहा पेंडसे आता ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या समोर येते आहे.  या मालिकेतील अनिता भाभी ही व्यक्तिरेखा यापुर्वी सौम्या टंडन साकारत होती. पण तिने मालिका सोडल्यानंतर  मालिकेत  अनिताच्या व्यक्तिरेखेसाठी नेहाची वर्णी लागली. नेहाने क्रुला जॉईन केल्यावर तिचं जंगी स्वागतही करण्यात आलं. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nehha Pendse (@nehhapendse)

 

पण आता मात्र तिला अनेकदा ट्रोल केलं जात आहे. नेहाला विनोदी भूमिका योग्य प्रकारे जमत नसल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे. याबाबत अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. यावर नेहाने ‘सतत कॉमेडी करायला मी काही कपिल शर्मा किंवा भारती सिंग नाही’ असं खरमरीत उत्तर तिने यावेळी दिलं आहे. टायमिंगनुसारचं विनोद केला जात असल्याचं ही तिचं म्हणणं आहे. भाभीजी घर पर है या मालिकेत शुभांगी अत्रे, रोहिताश गौड आणि आसिफ शेख हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत

Recommended

Loading...
Share