मराठमोळ्या इन्स्टा स्टारची गळफास लावून आत्महत्या

By  
on  

रूबाबदार व्यक्तिमत्त्वामुळे आणि आकर्षक वैचारिक व्हिडीओ सादर करण्याच्या स्टाईलमुळे  समीर गायकवाड  हा मराठी तरुण अल्पावधित इन्स्टा स्टार बनला. पुण्याच्या या तरुणाचा सोशल मिडीयावर मोठा चाहतावर्ग होता. पण या मराठमोळ्या इन्स्टा स्टारने नुकतीच आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. 

समीर गायकवाडने वाघोली येथील केसनंद रोडवरील निकासा सोसायटीमधील आपल्या राहत्या घरात गळफास घेतला. घरातील आपल्या रुममधील पंख्याला साडीच्या सहाय्याने फास लावून समीरने आत्महत्या केली. रविवारी सायंकाळी पाचच्यासुमारास ही घटना घडली. समीरचा भाऊ प्रफुल्लने या घटनेची माहिती लोणीकंदा पोलीस स्थानकामध्ये कळवली. समीरला पंख्याला लटकलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर घरच्यांनी त्याला खाली उतरवरुन तातडीने लाईफ लाईन रुग्णालयामध्ये नेलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. समीरने आत्महत्या का केली यासंदर्भातील कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. समीरच्या रुममध्ये किंवा खिशामध्ये कोणताही सुसाईड नोट मिळालेली नाही.

 

 

पोलिस या प्रकरणी कसून चौकशी करत आहेत. 

Recommended

Loading...
Share