आदेश बांदेकर यांच्या लेकाचं अभिनय क्षेत्रात पदार्पण

By  
on  

अवघ्या महाराष्ट्रात ओळखीचं नाव म्हणजे आदेश बांदेकर. अभिनय, सुत्रसंचालन अशा क्षेत्रात आदेश यांचं नाव आहे. आदेश यांच्यासोबत सुचित्रा बांदेकरही अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. पण बांदेकर कुटुंबातील आणखी एक सदस्य कलाक्षेत्रात येणार आहे. सोहम बांदेकर हे नाव आता कलाक्षेत्राशी जोडलं जात आहे. सोहम लवकरच एका मालिकेच्या माध्यमातून मराठी कलाविश्वात पदार्पण करत आहे.

 

 

आदेश बांदेकर निर्मित ‘नवे लक्ष्य’ या मालिकेच्या माध्यमातून सोहम अभिनय क्षेत्रात पदार्पण करतो आहे. आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी झटणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांच्या शौर्याची गोष्ट ‘लक्ष्य’ मधून दिसणार आहे. 7 मार्चपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे.

Recommended

Loading...
Share