By  
on  

हा खास फोटो पोस्ट करत शिवानी रांगोळेने दिल्या बॉयफ्रेंड विराजसला शुभेच्छा

मराठी सिनेसृष्टीच्या लव्हबर्डसमध्ये आणखी एका जोडीचं नाव सतत चर्चेत असतं ती म्हणजे शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी. ही जोडी सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असतेच. याशिवाय अनेकदा कार्यक्रमादरम्यानही एकत्र दिसते. मागील वर्षी  व्हॅलेंटाईन डेनिमित्त दोघांनी एकच फोटो पोस्ट करत या दोघांनी नात्याची एकप्रकारे कबुलीच दिली होती. 

 

 

आज विराजसच्या वाढदिवसाचं औचित्य साधत शिवानीने त्याच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ती म्हणते, ‘हॅपी बर्थ डे विराजस. तसं पाहता तुझं वय साडे सात वर्षंच असायला हवं. 29 ही तारीख तुझ्यासोबत पुढच्या वर्षी असेल अशी आशा आहे. शिवानी सध्या ‘सांग तू आहेस का?’ या मलिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. तर विराजस ‘ माझा होशील ना?’ या मालिकेत दिसतो आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive