By  
on  

या मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत घडला विनयभंगाचा प्रकार

दररोज स्त्रियांवरील अत्याचाराच्या अनेक बातम्या समोर येताना दिसतात. महिला सुरक्षचा दावा कितीही केला गेला असला तरी महिलांसोबतच्या असभ्य वर्तनाच्या बातम्या नेहमीच कानावर येत असतात. अभिनेत्री क्रांती रेडकरलाही असाच अनुभव आला आहे. क्रांतीसोबत एका मद्यपी व्यक्तीने असभ्य वर्तन केल्याचा प्रकार घडला आहे.

क्रांतीच्या गाडीसमोर एका मद्यपी व्यक्तीने गाडी लावली होती. क्रांती गाडी काढण्यासाठी सांगितल्यावर तिच्याशी या व्यक्तीने असभ्य वर्तन केलं. या प्रकरणी संबंधित व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive