अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी घेतली करोनाची लस

By  
on  

सध्याच्या कोरोनाग्रस्त परिस्थितीत देशातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या अजूनही वाढताना दिसत आहेत. यातच मनोरंजन विश्वातील कलाकारही कोरोनाच्या विळख्यात आल्याचं चित्र पाहायला मिळतय. सध्या 45 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना करोना लस दिली जात आहे. त्यामुळे करोना लसीचा लाभही अनेक कलाकार घेत आहेत. 

 

 

अभिनेत्री शुभांगी गोखले यांनीही नुकतीच करोनाची लस घेतली आहे. यावेळचा अनुभव शेअर करताना त्या म्हणतात, ‘आरोग्यसेतू च्या मदतीने आज माझे लसीकरण विनासायास पार पडले..सरकारी यंत्रणेचा सुखद अनुभव फ़ार वर्षांत अनुभवला नव्हता.. शक्यतो आॉनलाइन रजिस्ट्रेशन करुन गेलेलेच ऊत्तम लसीकरण केन्द्र हाकेवरच्या अंतरावर होतं.. पायी चालत परत येताना सु्ंदर ऋतूची सोबत होती आपलं राज्यफुल..तामण’  शुभांगी गोखले सध्या ‘राजा राणी ची गं जोडी’ आणि ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतून भेटीस येत आहेत.

Recommended

Loading...
Share