By  
on  

करोना काळात उत्तम कामगिरी करणा-या पोलिसांना पुण्यात मराठी कलाकारांकडून मानवंदना

अवघे जग आज कोरोनाच्या विळख्यात अडकले असून प्रत्येक देश आपापल्या परीने त्यावर मात करण्याचा प्रयत्न करत आहे. आपले केंद्र आणि राज्य सरकारही विविध उपाययोजना, खबरदारी घेऊन कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने पाऊले उचलत आहे. यात अनेक कोरोनायोद्धा राबत आहेत. त्यांच्यापैकीच एक म्हणजे पोलीस फोर्स.

 

या कठीण काळात ते अहोरात्र झटत असून या कोरोनायोद्धांचा आपल्या सर्वांनाच खूप अभिमान आहे. त्यामुळे त्यांना प्रोत्सहन देण्याच्या आणि त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्याच्या हेतूने पुणेकरांच्या वतीने एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. यावेळी सर्व पुणेकरांच्या वतीने अभिनेता अमेय वाघ आणि इतर कलाकारांनी सिंहगड पोलीस स्टेशनला भेट देऊन पुणे पोलिसांच्या मौल्यवान कामगिरीचे कौतुक करून त्यांचे आभार मानले. तसेच भेटवस्तू देऊन पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मानही केला. सुरक्षिततेची सर्व खबरदारी आणि सामाजिक अंतर राखून हा उपक्रम राबवण्यात आला.

Recommended

PeepingMoon Exclusive