By  
on  

म्हणून अभिनेत्री मिथिला पालकरला सोडावं लागलं आजी-आजोबांचं घर

एक चुणचुणीत आणि सुंदर, गोड अभिनेत्री म्हणून अल्पावधीतच आपल्या अभिनयाने सर्वांवर भुरळ पाडणारी अभिनेत्री मिथीला पालकर युथ सेंसेशन आहे. एका कप-सॉंगमुळे प्रसिध्दीच्या झोतात आलेल्या मिथीलाच्य अभिनयाची जादू अनेक वेब सिरीजच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मुरांबा या मराठी सिनेमातील तिच्या प्रमुख भूमिकेचंसुध्दा प्रचंड कौतुक झालं. ती नेहमीच स्वत:च्या अभिनयाची छाप पाडते.

 

 

मिथिला तिच्या आजी-आजोबांसोबत दादरला राहात असल्याचं आपल्याला माहिती होतंच. पण मिथिलाने अलीकडेच घर शिफ्ट केलं आहे. मिथिलाने आजी-आजोबांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर घर घेतलं आहे. मिथिलाने करोनामुळे हा निर्णय घेतल्याचं समोर येत आहे. तिची टेस्ट निगेटिव्ह आली असली तरी काळजीपोटी हा निर्णय घेतल्याचं समोर येत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive