अभिनेता अक्षय वाघमारे आणि योगिता गवळीने चाहत्यांशी शेअर केलं लेकीचं नाव

By  
on  

अभिनेता अक्षय वाघमारे गँगस्टर अरुण गवळी यांची लेक योगिता गवळीशी मागील वर्षी लग्नाच्या बेडीत अडकला. यानंतर वर्षातच या जोडीने गोड बातमी देत कन्यारत्नाचं स्वागत केलं आहे. एका पोर्टलने दिलेल्या बातमी नुसार योगिता आणि अक्षय गोड लेकीचे आई-बाबा बनले आहेत. 

 

 

यावर अक्षयने नुकताच लेकीच्या बारशाचा व्हिडियो शेअर केला आहे. अरना असं त्याच्या लेकीचं नाव आहे. अक्षय आगामी पावनखिंड सिनेमात झळकणार आहे.

Recommended

Loading...
Share