एकनाथ शिंदे यांच्या विरोधातील पोस्ट मराठी अभिनेत्याला पडली महागात, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By  
on  

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून सध्या बराच वाद सुरु आहे.  वादाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर फेसबुकवर पोस्ट केल्याप्रकरणी एका व्यक्तिला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ही व्यक्ती अभिनेता मयुरेश कोटकर असून त्याला रविवारी पोलिसांनी अटक केली आहे. 

 

ठाण्याच्या श्रीनगर पोलिसांनी ही अटकेची  कारवाई केली. न्यायालयीन कोठडीत असलेल्या कोटकर याला अद्याप जामीन मिळाला नसल्याचे कळते. पालकमंत्र्याविषयी असलेला हा आक्षेपार्ह मजकूर वागळे इस्टेटमधील शिवसेनेचे नगरसेवक योगेश जानकर यांच्या निदर्शनास आला. जानकर यांनी याबाबत श्रीनगर पोलिस ठाण्यात धाव घेत, कोटकर यांच्याविषयी तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनीच तो आक्षेर्पार्ह मजकूर फेसबुकवरुन डिलीट केला आहे. 

 

मयुरेश हा अनेक मालिका-सिनेमांमध्ये विविध व्यक्तिरेखा साकारत असल्याचे त्याच्या फेसबुक अकाऊंटवरुन लक्षात येते. 

Recommended

Loading...
Share