By  
on  

मी एक दिवस उशीरा शुभेच्छा देतोय…. म्हणत संतोष जुवेकरने केलं बिग बींना विश

काल बिग बी अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस झाला यावेळी त्यांच्यावर फॅन्सनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. पण अभिनेता संतोष जुवेकरने मात्र एक दिवस उशीरा बिग बींना विश केलं आहे. आपल्या पोस्टमध्ये त्याने याचं कारणही विशद केलं आहे. आपल्या पोस्टमध्ये तो म्हणतो, ‘ काल बच्चन साहेबांचा 79 वा वाढदिवस झाला. Happy Birthday Big B️

 

 

मी एक दिवस उशीरा शुभेच्छा देतोय (तश्या त्या कायमच आणि सतत आहेतच) पण नुसतं happy birthday wish नव्हतं करायचं मला माझ्या हिरोला त्याच्या साठी माझं वेड मला शब्दात मांडायच होत.
फार भारी नसलं तरी माझ्या हिरो साठीच हे वेड माझं माझं आहे शब्दांची शाही बिर्याणी नसली तरी
प्रेमानं भरलेल्या सुदामाच्या पोह्या सारखं आहे.️
"बच्चनच खुळं" तुला पाहिलं तेंव्हाच तुझ्यासारखं बनायचं ठरवलं कानापर्यन्त केस वाढवून, लांब coller चा shirt घालून आणि पोटापर्यंत pant चढवून हे बेन गावात फिरू लागलं. ते बघ आलं बच्चनच खुळं आता अख्ख गाव म्हणू लागलं. 
तुझा पिच्चर लागला की पाहिलं तिकीट माझं असायच मग घरी आल्यावर तू पडद्यावर काय काय केलंस ते सगळं आरशा समोर करून बघायचं. पाहुण्यांनी लाडाने दिलेले पैसे आणि बाबांन कढून मिळालेला pocket money खर्च न करता साठवून ठेचायचा. माझ्या वाढदिवसाला मित्रांना पार्टी देण्यात कंजूसपणा पण तुझ्या वाढदिवसाला मात्र दंगा असायचा. 
तुझ्या पोटात लागला गुद्दा खड्डा माझ्या काळजाला पडला होता तुझ्यावरच संकट टळावं म्हणून आख्खा देव्हारा पाण्यात ठेवला होता. लय फोडलंय बापानं तुझ्या खुळा पायी बापाचं हात सुजलं वेताच कूस सुटलं तरी तुझं खुळ काही गेलं नाही. 
का कस कोण जाणे तुझं असं खुळ लागलं अरे अनेकांच पोट नुसतं तुझ्या सारखं दिसण्यावरच भागलं. ओ बच्चन राव अहो अनेक आले अनेक गेले अजून अनेक येतील पण filmi दुनियेचा बेताज बादशहा लोकं तुलाच म्हणत राहतील.
आपुन जहाँ खडे होते हैं लाईन वहाँसे शुरु होती है...... हांई साला मालूम!!!!!️ (तुझ्या अनेक खुळ्यान मधला मी एक खुळा)
संत्या

Author

Recommended

PeepingMoon Exclusive