खास फोटो शेयर करत रिंकूने दिल्या आई-बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

By  
on  

सैराटची आर्ची म्हणून रिंकू राजगुरु महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या कानाकोप-यात पोहचली. अभिनेत्री रिंकू राजगुरुचा सोशल मिडीयावर मोठा चाहतावर्ग आहे. या चाहत्यांसाठी रिंकू तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. मात्र रिंकूने नुकतंच स्टोरी आई-बाबांचा एक गोड फोटो शेयर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

 रिंकूच्या आई वडिलांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त तिने खास शब्दात आई वडिलांना शुभेच्छा दिल्या आहेत.

नुकतंच रिंकूने तिच्या आई-वडिलांचा एक छान फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हा फोटो शेअर करत तिने खास पोस्टही लिहिली आहे. 

रिंकूचे आई-बाबा हे दोघंही पेशाने शिक्षक आहेत. रिंकूच्या अभिनय करियरमध्ये या दोघांचासुध्दा तिला खंबीर पाठिंबा असतो. 

Recommended

Loading...
Share