हा मराठी सिनेमा पाहा आणि बुलेट घेऊन जा...!

By  
on  

बुलेट ही एक अशी गाडी आहे ज्याचं स्वप्न प्रत्येकजण बघतो. या स्वप्नाला वयाची किंवा अन्य कोणतीही सीमा नसते. याच गोष्टीचा विचार करत आगामी मराठी चित्रपट ‘लॉ ऑफ लव्ह’ च्या निर्मात्यांनी प्रेमाच्या महिन्यात आपल्या खास प्रेक्षकांना त्यांची स्वप्नवत बुलेट भेट देण्याचे आयोजन केले आहे.
 
प्रेमाचा नवा अर्थ उलघडण्यासाठी येत्या ४ फेब्रुवारीपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात ‘लॉ ऑफ लव्ह’ हा चित्रपट भेटीस येत आहे. या सिनेमाचं औचित्य साधत निर्माते आणि अभिनेता जे. उदय यांनी ही भन्नाट संकल्पना योजली आहे. आपल्या प्रियजनांसोबत हा चित्रपट बघायला या आणि रॉयल एन्फिल्ड बुलेट घेऊन जा अशी ही संकल्पना आहे.


 
याबद्दल अभिनेता आणि निर्माते जे. उदय सांगतात, "रॉयल एन्फिल्ड गाडीचं स्वप्न प्रत्येकजण पाहतो, पण त्याची उपलब्धता मर्यादित असल्यामुळे सर्वानाच ती गाडी घेणे शक्य होत नाही. या लकी ड्रॉ स्पर्धेमार्फत आम्ही तब्बल ५० गाड्या महाराष्ट्रातील आपल्या रसिक प्रेक्षकांना देऊ इच्छित आहोत. याने त्यांचा व्हॅलेंटाईन आणखीनच खास होईल याची आम्हाला खात्री आहे. सोशल मीडियावर याबद्दलची अन्य माहिती वेळोवेळी देऊ. त्याकरीता ‘लॅा ॲाफ लव्ह’ च्या फेसबुक पेजला लाईक करा”
 
वेदिका फिल्म क्रिएशन आणि जे. उदय निर्मित लॉ ऑफ लव्ह येत्या ४ फेब्रुवारीपासून आपल्या  जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

Recommended

Loading...
Share