By  
on  

का रे दुरावा ! अमृता खानविलकर पती हिमांशूपासून राहते दूर, जाणून घ्या सत्य

मराठी सिनेसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मिडीयावर प्रचंड सक्रीय असते. बोल्ड आणि ग्लॅमरस अमृता खानविलकरच्या आगामी ुप्रोजेक्टसची चाहत्यांना बरीच उत्सुकता असते. अमृताचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चंद्रमुखी हा  सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, हा सिनेमा लावणीसम्राज्ञीच्या आयुष्यावर बेतला असून यात ती चंद्रा ही नायिका साकारतेय. दरम्यान अमृताच्या खासगी आयुष्याबाबत काही अफवांना पेव फुटलंय. 

अमृताने हिंदी मालिकांमधील अभिनेता हिमांशू मल्होत्राशी लग्न केले. पण ते दोघे वेगळे राहत असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यामागचं सत्य आता समोर आलं आहे.

अमृता आणि हिमांशूने २०१५ मध्ये लग्न केले. तर या दोघांची पहिली भेट ही २००४ साली झाली होती. झी सिनेस्टार की खोज या अभिनयाच्या रिएलिटीशो दरम्यान अमृता आणि हिमांशूमध्ये आधी मैत्री आणि मग प्रेमाचं नातं खुललं, 

 

 

नेहमीच अमृता आणि हिमांशू त्या दोघांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात.चाहत्यांचीही खुप पसंती मिळते. 

पण या सगळ्यात अमृता तिच्या पतीपासून वेगळे राहत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, ही फक्त अफवा असल्याचे एका रिपोर्टनुसार समोर आले आहे.

अमृता सध्या आपले सिनेमे, आगामी प्रोजेक्टस् आणि प्रोमोशन्समुळे अर्थातच सर्व वर्क कमिटमेंटमुळे मुंबईत राहते. तर हिमांशू हा मूळचा दिल्लीचा रहिवासी आहे. त्याच्या आईसोबत सध्या तिथेच राहतो. हिमांशूची दिल्लीतही काही कामं आहेत. मात्र, दोघे ही सध्या एकत्रच आहेत, असे अमृताने सांगितले.

सोशल मिडीयावर जेव्हा हे कपल फोटो पोस्ट करतो तेव्हा फॉलोवर्स त्यावर लाईक्सचा वर्षाव करतात. ही ऑफस्क्रिन रियल लाईफ जोडी अनेकांना आवडते. सोशल मिडीयावरही दोघांची अपडेट्स आणि एकत्र फोटो दोघांच्या चाहत्यांना आवडतात. 'नच बलिये' या प्रसिद्ध डान्स रिएलिटी शोच्या सातव्या पर्वाचे दोघं विजेते ठरले होते. या जोडीला त्या कार्यक्रमातही पसंत केलं होतं. 2015 मध्ये अमृता आणि हिमांशुने लगीनगाठ बांधली होती. 

Recommended

PeepingMoon Exclusive