‘सत्यवान सावित्री’ मालिकेत ही अभिनेत्री साकारतेय मुख्य भूमिका

By  
on  

छोट्या पडद्यावर सध्या सत्यवान सावित्री या मालिकेच्या प्रोमोंनी रसिक प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पुराणातील सत्यवान सावित्रीची कथा आता मालिका रुपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यमदेवाकडून मोठ्या चातुर्याने सावित्रीने सत्यवानाचे प्राण परत मागून आणले अशी  ही पुराणकथा आपण फार पूर्वीपासून ऐकत आलो आहोत. 

या मालिकेचे प्रोमो नुकतेच झी मराठीवर  प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि प्रेक्षकांची मालिकेबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली. या मालिकेत सावित्रीची भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता देखील प्रेक्षकांना होती, त्याच उत्तर देखील प्रेक्षकांना नुकतंच वाहिनीवर प्रदर्शित झालेल्या प्रोमोमधून मिळालं. या मालिकेत अभिनेत्री वेदांगी कुलकर्णी हि सावित्रीच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत सावित्रीची बालपणापासूनची कथा दाखवण्यात येणार आहे.

या मालिकेत बालपणीच्या सावित्रीची भूमिका राधा धरणे साकारणार असून वेदांगी या मालिकेत तरुणपणीच्या सावित्रीची मध्यवर्ती भूमिका साकारताना दिसेल. वेदांगीने या आधी अनेक मालिकांमधून विविध भूमिका साकारल्या असून ती एक नृत्यांगना देखील आहे. ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ या कार्यक्रमामधून वेदांगी प्रेक्षकांच्या भेटीस आली होती.

Recommended

Loading...
Share