अशोक सराफ यांच्याशिवाय मराठी चित्रपट सृष्टीची कल्पना कोणी करू शकत नाही - भरत जाधव

By  
on  

विनोदी भूमिका साकारत आपल्या लाजवाब टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसविणारे अभिनेते म्हणजे अशोक सराफ. अशोक सराफ यांचा आज ७५ वा वाढदिवस आहे. अशोक सराफ मराठी सिनेसृष्टीचे बादशाह. त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रसिध्द अभिनेता भरत जाधव याने त्यांच्याविषयी खास पोस्ट आज अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त शेयर केली आहे. 

भरत जाधव म्हणतो, "एखाद्या व्यक्तिमत्वाचं मूल्यमापन करायच असेल तर फक्त एका प्रश्नाचं उत्तर शोधावं की, " ती व्यक्ती नसती तर..?? "

अशोक सराफ यांच्याशिवाय मराठी चित्रपट सृष्टीची कल्पना सुद्धा कोणी करू शकत नाही इतकं मोठं योगदान त्यांचं आहे. या इंडस्ट्रीत नाव कमवायला खुप जण येतात पण एकेकाळी आख्खी मराठी सिने इंडस्ट्री जगवणारा फक्त एखादाच अशोक सराफ असतो.

मी स्वतःला भाग्यवान समजतो की हिरो म्हणून पदार्पण करत असताना पहिल्याच चित्रपटात अशोक मामांसोबत काम करण्याची संधी मिळाली. व पुढेही अनेक सिनेमातून आम्ही एकत्र काम केलं. अशोक सराफ यांच्या सारखी माणसं ही दिपस्तंभासारखी असतात. त्यांच्याकडे पाहतं रहावं...त्यांच्याकडून शिकतं रहावं आणि आपली वाटचाल करत रहावी..!

अशोक मामा म्हणजे Man with The Midas Touch... त्यांनी ज्या ज्या भूमिकांना हात लावला त्याचं सोन झालं. अशा या अभिनयाच्या अनभिषिक्त सम्राटास व माणुस म्हणूनही 'नवकोट नारायण' असलेल्या प्रिय मामांना ७५ व्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा..!!

आणि हे ७५ वय वगैरे इतरांसाठी.. त्यांच्या अफाट एनर्जी व उत्साहासमोर ते अगदीच 'अतिसामान्य' आहे..

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat)

Recommended

Loading...
Share