“महाविकासआघाडीची वेळ संपत आलीय…”, अभिनेता आरोह वेलणकरणचे ट्विट चर्चेत

By  
on  

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचं बदलतं चित्र सर्वांसमोर येतंय. जुळून येणारी गणितं बदलतायत. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. त्यांची समजूत घालण्यासाठी आणि महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी सुरतमध्ये जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. मात्र, या चर्चेतून अद्याप कोणताही मार्ग समोर आलेला नाही. त्यामुळे ही चर्चा निष्फळ ठरल्याचं दिसत आहे. त्यानंतर आता एकनाथ शिंदे शिवसेनेचे ३३ तर अपक्ष सात अशा एकूण ४० आमदारांना सोबत घेऊन सुरतहून आसाममधील गुवाहाटी येथे पोहोचले आहे. या आमदारांना रात्रीच चार्टर्ड विमानाने गुवाहाटी येथे एअर लिफ्ट करण्यात आलं. राज्यातील या बदलत चालेल्या राजकीय घटनांवर अनेक स्तरांतून लोक व्यक्त होत आहेत. 

दरम्यान,  एका मराठी अभिनेत्याने याबाबत एक ट्विट केले आहे. अभिनेता आरोह वेलणकर हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो.

“महाराष्ट्राचे एकूण ५० आमदार हे सध्या आसाममधील गुवाहाटी इथे उपस्थित आहेत. “महाविकासआघाडीची वेळ संपत आलीय, असे मला वाटतं आहे. चला पाहू पुढे काय होतंय?” असे ट्विट आरोह वेलणकरने केले आहे

 

 

आरोहच्या या ट्विटवर अनेकांनी आपली मतं नोंदवली आहेत. तर अनेकांनी त्याला ट्रोलही केलंय.  

Recommended

Loading...
Share