By  
on  

ज्येष्ठ लेखिका शांता गोखले यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर ; रेणुका शहाणेंनी शेयर केली पोस्ट!

मराठीसह हिंदी सिनेक्षेत्रांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री रेणुका शहाणे सोशल मीडियावर बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असतात. नुकतीच रेणुका शहाणे यांनी आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत, गोड बातमी दिली आहे.

रेणुका शहाणेंनी त्यांच्या आईंना म्हणजेच ज्येष्ठ लेखिका शांता गोखले यांना साहित्य अकादमीच्या पुरस्कार मिळाल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर शेयर केली आहे. ही पोस्ट शेअर करत त्यांनी असं म्हटलंय की, ''अत्यंत अभिमानस्पद, सांगताना आनंद होत आहे माझ्या प्रतिभावंत आई शांता गोखले यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. लक्ष्मीबाई टिळकांच्या "स्मृतिचित्रे"च्या "द मेमोयर्स ऑफ अ स्पिरिटेड वाईफ" मध्ये इंग्रजी अनुवादासाठी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. या प्रचंड मोठ्या सन्मानाबद्दल साहित्य अकादमी पुरस्काराचे आभार'. असं म्हणत रेणुका यांनी ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे.

शांता गोखले या प्रसिद्ध लेखिका, पत्रकार, अनुवादक आणि त्याचबरोबर नाट्यसमीक्षक देखील आहेत. त्यांचं मराठी-इंग्रजी भाषेवर मोठं प्रभुत्व असून त्यांनी अनेक मराठी-इंग्रजी पुस्तकांचं लिखाण केलं आहे. यासाठी त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले असून आता यात आणखी एका पुरस्काराची भर पडली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री रेणुका शहाणे त्यांची लेक आहे . दरम्यान रेणुका शहाणे यांनी हिंदीसह मराठी सिनेसृष्टीत नाव कमावल्यानंतर त्या आता छोट्या पडद्यावरून देखील प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive