Video: बॉलिवूडचे प्रसिध्द गायक विशाल ददलानी यांच्या स्वरात अनुभवा 'अनन्या'ची जिद्द

By  
on  

प्रताप फड दिग्दर्शित ‘अनन्या’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. नुकतेच या चित्रपटातील ‘तू धगधगती आग’ हे स्फूर्तीदायी गाणे झळकले असून या जबरदस्त  गाण्याला बॅालिवूडचे सुपरहिट गायक विशाल ददलानी यांचा भारदस्त आवाज लाभला आहे. अभिषेक खणकर यांचे बोल लाभलेल्या या गाण्याला समीर साप्तीस्कर यांनी संगीत दिले आहे. आयुष्यातील एका कठीण प्रसंगावर मात करत ‘अनन्या’ जिद्दीने आणि खंबीरपणे लढत असल्याचे यात दिसतेय. ‘शक्य आहे. तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे.’ या टॅगलाईनचा अर्थ यातून स्पष्ट होत असून प्रचंड ऊर्जेने भरलेले हे गाणे आहे.
 
  दिग्दर्शक प्रताप फड या गाण्याबद्दल म्हणतात, “या गाण्याची खासियत म्हणजे ज्यांनी बॅालिवूडला एकापेक्षा एक सुपरहिट गाणी दिली अशा विशाल ददलानी यांनी हे गाणे गायले आहे. विशेष म्हणजे हे गाणे विशाल यांनी गाताना खूपच एन्जॉय केले. त्यामुळे त्यांचातील या सकारात्मक लहरी यात गाण्यात आपसूकच आल्या आहेत. हे गाणे अधिकच बळ देणारे बनले.’' 

निर्माता रवी जाधव म्हणतात, '' हे गाणे अतिशय प्रेरणा देणारे असून या गाण्याची संगीत टीम अतिशय तगडी आहे. विशाल ददलानी यांनी आपल्या आवाजाने या गाण्याला एका वेगळ्याच उंचीवर नेले आहे. यातील प्रत्येक गाणे काहीतरी सांगत आहे. त्यामुळे ही गाणी श्रोत्यांना अधिक भावतील.'' 

 

 

एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट, ड्रीमव्हीवर एन्टरटेन्मेंट व रवी जाधव निर्मित या चित्रपटाचे लेखन प्रताप फड यांनी केले आहे. ध्रुव दास, रवी जाधव व संजय छाब्रिया निर्मित ‘अनन्या’ येत्या २२ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

Loading...
Share