एक डोळस नवरात्र, पाहा Photos

By  
on  

मराठी टेलीव्हिजन विश्वातील प्रसिद्ध चेहरा आणि महाराष्ट्राचं लाडक पात्र शनाया म्हणजेच रसिका सुनील हिने एका वेगळ्या ढंगात नवरात्र साजरी केली. रसिकाने दादर येथील कमला मेहता अंध मुलींच्या शाळे तील मुलींसोबत काही क्षण घालवले. मुलींसोबत दांडिया रंगवण्याबरोबरच तिने तब्बल २५० अंध मुलींच्या रिंगणात गरब्यावर ताल धरला. 

"लहानपणापासूनच नवरात्री साजरी करतेय, पण यंदाची नवरात्रोत्सव माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. मी इतक्या सुंदर आणि बुद्धिवान मुलींच्या सानिध्यात काही क्षण घालवले. माझ्यासाठी त्या नवदुर्गा असून एक डोळस नवरात्र मी या निमित्ताने साजरी केली आहे " अशी प्रतिक्रिया तिने दिली.

Recommended

Loading...
Share