मराठी गायकाला लाखोंचा गंडा घालून बनावट आयपीएस अधिकारी फरार

By  
on  

मराठी गायक अशोक निकाळजे यांना मोठ्या संगीत कार्यक्रमाचं आमिष दाखवून दोन- अडीच लाख रुपयांची गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. दोन बनावट आयपीएस अधिका-याने या कार्यक्रमाचं आमिष दाखवून निकाळजे यांची फसवणूक केली आहे. 

आयपीएस अधिकारी असल्याचे सांगून आरोपीने पहिल्यांदा १४ ऑक्टोबरला निकाळजे यांना फोन केला होता. “लवकरच होणाऱ्या एका संगीत कार्यक्रमात तुम्हाला आमंत्रित करायचे आहे” असे आरोपीने त्यांना म्हटले होते.कार्यक्रमासाठी आठ लाखांचे मानधन मिळवण्यासाठी आधी अडीच लाख रुपये भरावे लागतील, अशी मागणी आरोपीने निकाळजे यांच्याकडे केली होती. त्यानुसार पैसे भरल्यानंतर आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे निकाळजे यांच्या लक्षात आले. झाला प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी मुंबईतील टिळकनगर पोलिस ठाण्यात धाव घेत रितसर तक्रार केली. 

Recommended

Loading...
Share