By  
on  

'हर हर महादेव'चा शो बंद पाडून उलट प्रेक्षकांनाच मारहाण, आव्हाडांच्या 100 समर्थकांवर गुन्हे दाखल

‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो  ठाण्यातील विवीयाना मॉलमधील सिनेमागृहात सोमवारी रात्री १० वाजता सुरू होता त्यावेळी राष्ट्रवादीने ऐन सिनेमागृहात घुसून तो बंद पडला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात येत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं.

राष्ट्रवादीने प्रेक्षकांना सिनेमागृहात बाहेर जाण्याचे आवाहन केले. त्यानंतरही सिनेमागृहात बसून असलेल्या प्रेक्षकांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हुसकावून लावल्याने किरकोळ वादाचे प्रसंगही घडले. त्यात एका प्रेक्षकाला मारहाणही झाली.या प्रकरणी आता 100 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहे.

मारहाणीचा व्हिडीओ आला समोर

 

या संपूर्ण घटनाक्रमानंतर जितेंद्र आव्हाड यांनी प्रसिध्दी माध्यमांशी संवाद साधत सिनेमाद्वारे चुकीचा इतिहास मांडल्याचा आरोप केलाय. ‘हर हर महादेव’ आणि अभिनेता अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत असलेल्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटांना आव्हाड यांनी विरोध केला. काही दिवसांपूर्वीच संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्रकार परिषद घेत इतिहिसाची मोडतोड करुन दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांना विरोध केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटद्वारे मोठे विधान केले होते. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा आणि चुकीचा इतिहास मांडण्याची परंपरा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी सुरू केला, असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला होता. या विरोधानंतर सोमवारी आव्हाड यांनी कार्यकर्त्यांसहीत थेट चित्रपटगृहातील चित्रपटाचा शो बंद पाडला.

Recommended

PeepingMoon Exclusive