मावशीच्या मेहंदीसाठी मायराचा खास लुक, पाहा Photos

By  
on  

 माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे या फ्रेश जोडीसह गोड चिमुकली मायरा वायकुळ रसिकांची लाडकी बनली.  नेहा कामतची लेक परी म्हणून मालिकेत तिची खुप महत्त्वपूर्ण भूमिका होती. आता मालिका संपली तरी तिची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. सोशल मिडीयावर परी फेम मायराचा खुप मोठा चाहता वर्ग आहे.

फक्त सामान्य प्रेक्षकच नाही तर अनेक सेलिब्रिटीसुध्दा तिचे चाहते आहेत. विविध गेटअप्से मधले, ट्रेंडींग गाण्यावर थिरकतानाचे मायराचे व्हिडीओ व फोटो खुप व्हायरल होतात. 

नुकतंच मायराने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपले काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.

मायराने फोटो शेअर करत 'मेहंदी है रचनेवाली' असं म्हटलं आहे.

मायरा मावशीच्या लग्नासाठी नाशिकला पोहचलीय. तिच्याच मेहंदी सोहळ्यातला हा खास लुक आहे. 

Recommended

Loading...
Share