By  
on  

वेळेचं गणित विद्या सोडवू शकेल का? स्पृहा जोशी 'विकी वेलिंगकर' सिनेमात महत्वपूर्ण भूमिकेत

सोनाली कुलकर्णीचा 'हिरकणी' नंतर 'विकी वेलिंगकर' ची सध्या सगळीकडे चर्चा आहे. सोनालीचा राॅ लूक आणि कौटुंबिक थ्रिलर पठडीतला या सिनेमाची सध्या सर्वांना उत्सुकता आहे. या सिनेमात सोनाली कुलकर्णी सोबत आणखी कोणते कलाकार असणार हे अद्याप गुलदस्त्यात होते. पण आता या गोष्टीवरून पडदा उठला असून या सिनेमात सोनालीसोबत स्पृहा जोशी सुद्धा महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. 

स्पृहा जोशीच्या भूमिकेबद्दल सविस्तर माहिती कळली नसली तरी स्पृहा या सिनेमात 'विद्या' हि व्यक्तिरेखा साकारत आहे. या विद्याला एका ठराविक वेळेमध्ये विकीला संकटातून सोडवायचं चॅलेंज असतं, वेळेच्या या गणितामध्ये विद्या विकीला सोडवू शकणार का, हे प्रेक्षकांना सिनेमा पाहूनच कळेल. आता यामध्ये विकी वेलिंगकर नेमका कोण आहे? आणि विकीची भूमिका कोण साकारणार आहे, हा प्रश्न सर्वांना पडला आहे. 

सोनाली कुलकर्णी ही या चित्रपटामध्ये मध्यवर्ती भूमिकेत दिसणार असून तिच्याबरोबर स्पृहा जोशी देखील या चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. स्पृहा जोशी यापूर्वी बाबा, होम स्वीट होम, मोरया, देवा, पेइंग गेस्ट, मला काहीच प्रॉब्लेम नाही यांसारख्या चित्रपटामध्ये झळकली होती.

आपल्या भूमिकेविषयी बोलताना स्पृहा जोशी म्हणाली की “मला सौरभ वर्मा यांची कथा सांगण्याची शैली मला खूप आवडली. ज्या प्रकारे ते कथा सांगत होते त्यावरून या चित्रपटाची कथा खूप वेगळी आहे आणि या कथेत असं काही आहे की जे मी या आधी कधीही पाहिलेलं नाही. कथा ऐकल्यानंतर माझ्या भूमिकेची लांबी किती आहे याचा मी विचार केला नाही कारण मला माहित आहे की विक्की वेलिंगकरच्या कथेत विक्की ही विद्या शिवाय अपूर्ण आहे. मला ही भूमिका साकारताना खूप मज्जा आली आणि मला असं वाटतंय की प्रेक्षकांनाही ही भूमिका बघताना खूप चांगला अनुभव येईल.”

सोनाली कुलकर्णी, स्पृहा जोशी आणि संग्राम समेळ यांची प्रमुख भूमिका असलेला ‘विक्की वेलिंगकर’ संपूर्ण महाराष्ट्रात ६ डिसेंबर २०१९ रोजी प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive